३ नोव्हेंबर – जन्म

१६८८: अम्बर संस्थानचे राजा सवाई जयसिंग (दुसरे) यांचा जन्म. (मृत्यू: २१ सप्टेंबर १७४३)

१९००: अॅडिडास चे संस्थापक एडॉल्फ डॅस्लर यांचा जन्म. (मृत्यू: ६ सप्टेंबर १९७८)

१९०१: दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते, रंगमंच आणि सिनेकलावंत व राज्यसभा सदस्य पृथ्वीराज कपूर यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे १९७२)

१९१७: भारतीय स्वतंत्रसैनिक अन्नपूर्णा महाराणा यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर २०१२)

१९२१: अमेरिकन अभिनेते चार्ल्स ब्रॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट २००३)

१९२५: प्रबंधलेखक, संपादक डॉ. हे. वि. इनामदार यांचा जन्म.

१९३३: नोबेल पुरस्कार प्रमाणित मा. अमर्त्य सेन यांचा जन्म.

१९३७: चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्‍या लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे १९९८)