३ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू.

१८६७: शिवणयंत्राचे संशोधक एलियास होवे यांचे निधन. (जन्म: ९ जुलै  १८१९)

१८९१: फ्रेन्च गणिती एडवर्ड लूकास यांचे निधन. (जन्म: ४ एप्रिल १८४२)

१९५९: विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक दत्तात्रय तुकाराम तथा दत्तू बांदेकर ऊर्फ सख्याहरी यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १९०९)

१९९५: भारतीय लेखक व राजकारणी मा. पो. सी. यांचे निधन. (जन्म: २६ जुन १९०६)

१९९९: सोनी कार्पोरेशनचे संस्थापक अकिओ मोरिटा यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १९२१)

२००७: सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड यांच्या विरुद्ध एफआयआर नोंदविणारे रवींद्र पाटील यांचे टी. बी. रोगामुळे निधन.

२००७: भारतीय पत्रकार, लेखक, आणि शैक्षणिक एम. एन. विजयन यांचे निधन. (जन्म: ८ जून १९३०)

२०१२: सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर केदारनाथ सहानी यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९२६)

२०१२: भारतीय धर्मशास्त्रज्ञ आणि विद्वानअब्दुल हक अन्सारी यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९३१)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.