३ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.

१८५५: आध्यात्मिक गुरू पंत महाराज बाळेकुंद्री यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १९०५)

१८६९: सेंद्रिय पदार्थांच्या पृथक्करणासाठी रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ फ्रिट्झ प्रेग्ल यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १९३०)

१८७५: पोर्श्या मोटार कंपनी चे संस्थापक फर्डिनांड पोर्श्या यांचा जन्म. (मृत्यू: ३० जानेवारी १९५१)

१९०५: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ कार्ल डेव्हिड अँडरसनयांचा जन्म.

१९२३: प्रख्यात तबलावादक किशन महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ४ मे २००८)

१९२३: टाको बेल चे संस्थापक ग्लेन बेल यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी २०१२)

१९२३: महाराष्ट्र शाहीर कृष्णराव तथा शाहीर साबळे यांचा जन्म.

१९२७: बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते अरुण कुमार चटर्जी तथा उत्तम कुमार यांचा जन्म. (मृत्यू: २४ जुलै १९८०)

१९३१: नाटककार श्याम फडके यांचा जन्म.

१९३८: नोबेल पारितोषिक विजेते जपानी रसायनशास्त्रज्ञ रायोजी नोयोरी यांचा जन्म.

१९४०: लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार प्यारेलाल शर्मा यांचा जन्म.

१९५६: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक जिझु दासगुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर २०१२)

१९६५: अमेरिकन अभिनेता चार्ली शीन यांचा जन्म.

१९७१: भारतीय-अमेरिकन लेखक किरण देसाई यांचा जन्म.

१९७४: भारतीय क्रिकेटपटू राहुल संघवी यांचा जन्म.

१९७६: चित्रपट अभिनेता विवेक ओबेरॉय यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.