३० एप्रिल रोजी झालेले जन्म.

१७७७: जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ कार्ल फ्रेड्रिक गाऊस यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १८५५)

१८७०: भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९४४)

१९०९: माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १९६८)

१९१०: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी आणि गीतकार श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ श्री श्री राव यांचा जन्म. (मृत्यू: १५ जून १९८३)

१९२१: जीपीएस चे सहसंशोधक रॉजर एल. ईस्टन यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे २०१४)

१९२६: मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर २०११)

१९८७: भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.