३० एप्रिल रोजी झालेले मृत्यू.

१०३०: तुर्कीच्या गझनवी साम्राज्याचा शासक मोहंमद गझनी यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर ९७१)

१८७८: साक्षात्कारी सत्पुरुष व दत्तावतारी स्वामीमहाराज अक्‍कलकोट यांनी समाधी घेतली.

१९१३: व्याकरणकार आणि निबंधकार मोरो केशव दामले यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८६८)

१९४५: जर्मनीचे नाझी हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर यांनी आत्महत्या केली. (जन्म: २० एप्रिल १८८९)

२००१: प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञ श्रीपाद अच्युत दाभोळकर यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९२४)

२००३: मराठी साहित्यिक वसंत पोतदार यांचे निधन. (जन्म: २० नोव्हेंबर १९३९ – आष्टी, उस्मानाबाद)

२०१४: भारतीय चित्रकार आणि सेट डिझायनर खालिद चौधरी यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९१९)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.