३० ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू.

१७७३: सुमेर गार्दी याने नारायणराव पेशवे यांची शनिवारवाड्यात हत्या केली. (जन्म: १० ऑगस्ट १७५५)

१९४०: इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ सर जे. जे. थॉमसन यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १८५६)

१९४७: मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचे निधन. (जन्म: १ जून १८७२)

१९८१: शिक्षणतज्ज्ञ, इंडियन इन्स्टिट्ट ऑफ यु एज्केशनचे संस्थापक जे. पी. नाईक यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १९०७)

१९९४: प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी शं. गो. तुळपुळे यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९१४)

१९९८: स्वातंत्र्यसैनिक, निर्भीड पत्रकार नरुभाऊ लिमये यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९०९)

२००३: अमेरिकन अभिनेता चार्ल्स ब्रॉन्सन यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर १९२१)

२०१४: भारतीय इतिहासकार बिपन चंद्र यांचे निधन. (जन्म: २७ मे १९२८)

२०१५: भारतीय विद्वान लेखक एम. एम. कळबुर्गी यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १९३८)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.