३० जानेवारी रोजी झालेले जन्म.

१८८२: अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १९४५)

१९१०: गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल सी. सुब्रम्हण्यम यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर २०००)

१९११: शास्त्रीय गायक पं. गजाननबुवा जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २८ जून १९८७)

१९१७: स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ वामन दत्तात्रय पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: २७ जुलै २००७)

१९२७: स्वीडनचे २६ वे पंतप्रधान ओलोफ पाल्मे यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९८६)

१९२९: हिंदी, मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक रमेश देव यांचा जन्म.

१९४९: नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते, थिएटर अ‍ॅकॅडमी चे एक संस्थापक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा चे संचालक, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते डॉ. सतीश आळेकर यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.