३० जून रोजी झालेल्या घटना.

१८५९: चार्ल्स ब्लांडिन यांनी नायगारा धबधबा एकादोरीबारून कसरत करीत पार केला.

१९३७: जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक ९९९ लंडनमध्ये सुरु करण्यात आला.

१९४४: मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रभातचा रामशास्त्री हा चित्रपट रिलीज झाला.

१९६०: काँगोला बेल्जियमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

१९६५: भारत पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.

१९६६: कोकासुब्बा राव भारताचे वे सरन्यायाधीश झाले.

१९६६: अमेरिकेची सर्वात मोठी स्त्रीवादी संस्था नॅशनल ऑरगनायझेशन फॉर वुमन ची स्थापना झाली.

१९७१: सोयुझ-११या रशियन अंतराळयानात बिघाड होऊन तीन अवकाशवीर ठार झाले.

१९७८: अमेरिकेच्या संविधानात २६ वा बदल संमत झाला त्यामुळे मतदानाचे वय १८ वर्षे झाले.

१९८६: केंद्रसरकार मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचे ठरले.

१९९७: ब्रिटनने चीन कडून ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेले हाँगकाँग मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले.

२००२: ब्राझीलने फुटबॉल विश्वकप जिंकला.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.