३० मार्च – जन्म

३० मार्च रोजी झालेले जन्म.

१८५३: डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉग यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै १८९०)

१८९४: इल्युशीन विमान कंपनी चे निर्माते सर्जी इल्युशीन यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९७७)

१८९५: सोविएत युनियनचे अध्यक्ष निकोलाय बुल्गानिन यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १९७५)

१८९९: बंगाली लेखक शरदेंन्दू बंदोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९७०)

१९०६: भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९६५)

१९०८: भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिल्या अभिनेत्री देविका राणी यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १९९४)

१९३८: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चे स्थापक क्लाउस स्च्वाब यांचा जन्म.

१९४२: भाषातज्‍ज्ञ, कोशकार, लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके यांचा जन्म.

१९७७: भारतीय संचालक आणि पटकथालेखक अभिषेक चोब्बे यांचा जन्म.