३० मार्च – मृत्यू

३० मार्च रोजी झालेले मृत्यू.

१९५२: भूतानचे २ रे राजे जिग्मे वांगचुक यांचे निधन.

१९६९: कवी व समाजसेवक वासुदेव गोविंद मायदेव यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १८९४)

१९७६: चित्रकार रघुवीर मूळगावकर यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९१८)

१९८१: रीडर्स डॅाजेस्ट चे निर्माते डेविट वलास यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १८८९)

१९८९: सोबत साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक गजानन वासुदेव तथा ग. वा. बेहेरे यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९२२)

२००२: गीतकार आनंद बक्षी यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १९२०)

२००५: भारतीय लेखक आणि चित्रकार ओ. व्ही. विजयन यांचे निधन. (जन्म: २ जुलै १९३०)

२०१२: कॅनेडियन-भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक अक्विला बेर्लास किंनी यांचे निधन.