३० मे रोजी झालेले मृत्यू.

१४३१: फ्रान्सला परकीय जोखडातून मुक्त करणार्‍या जोन ऑफ आर्कला चेटकीण ठरवून जाळण्यात आले. नंतर मात्र तिला संत ठरवले गेले. ती द मेड ऑफ ऑर्लिन्स या टोपणनावानेही ओळखली जाते. (जन्म: ६ जानेवारी १४१२)

१५७४: फ्रान्सचा राजा चार्ल्स (नववा) यांचे निधन. (जन्म: २७ जून १५५०)

१७७८: फ्रेन्च तत्त्वज्ञ व लेखक व्होल्टेअर यांचे निधन. (जन्म: २१ नोव्हेंबर १६९४)

१९१२: आपला भाऊ ऑर्व्हिल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते विल्बर राईट यांचे निधन. (जन्म: १६ एप्रिल १८६७)

१९४१: थायलँडचा राजा प्रजाधिपोक ऊर्फ राम (सातवा) यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १८९३)

१९५०: प्राच्यविद्या संशोधक दत्तात्रय रामकृष्ण भांडारकर यांचे निधन.

१९५५: भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचे निधन. (जन्म: ५ जून १८७९)

१९६८:चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १८८२)

१९८१: बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांची हत्या. (जन्म: १९ जानेवारी १९३६)

१९८९: शिख संतकवी दर्शनसिंहजी महाराज यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १९२१)

२००७: भारतीय कवी आणि समीक्षक गुंटूर सेशंदर शर्मा यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १९२७)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.