३० नोव्हेंबर रोजी झालेले जन्म.

१६०२: जर्मन पदार्थवैज्ञानिक ऑटो व्हॉन गॅरिक यांचा जन्म. (मृत्यू: २१ मे १६८६)

१७६१: हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ स्मिथसन टेनांट यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १८१५)

१८३५: विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार मार्क ट्वेन यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९१०)

१८५८: भारतीय वनस्पती शास्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस यांचा जन्म. (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९३७)

१८७४: ब्रिटनचे माजी पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी १९६५)

१९१०: गोमंतकीय कवी बाकीबाब उर्फ बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचा खावार्डे, गोवा येथे जन्म. (मृत्यू: ९ जुलै १९८४)

१९३५: मराठी लेखक आनंद यादव यांचा जन्म.

१९३६: युथ इंटरनॅशनल पार्टीचे संस्थापक ऍबी हॉफमन यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १९८९)

१९४५: पार्श्वगायिका वाणी जयराम यांचा जन्म.

१९६७: सामाजिक कार्यकर्ता राजीव दिक्षीत यांचा जन्म. (मृत्यू: ३० नोव्हेंबर २०१०)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.