३० नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू.

१९००: सुप्रसिद्ध लेखक कवी आणि नाटककार ऑस्कर वाईल्ड यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १८५४)

१९७०: जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर निना रिकी यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १८८३)

१९८९: कॅमेरून देशाचे पहिले अध्यक्ष अहमदिऊ आहिदो यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १९२४)

१९९५: साहित्यिक वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे यांचे निधन. (जन्म: १६ जुलै १९१४)

२०१०: सामाजिक कार्यकर्ता राजीव दिक्षीत यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १९६७)

२०१२: भारताचे १२ वे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९१९)

२०१४: अरुणाचल प्रदेशचे ७वे मुख्यमंत्री जर्बोम गॅमलिन यांचे निधन. (जन्म: १६ एप्रिल १९६१)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.