३१ ऑगस्ट रोजी झालेले जन्म.

१५६९: ४ था मुघल सम्राट जहांगीर यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर १६२७)

१८७०: इटालियन डॉक्टर व शिक्षणतज्ज्ञ मारिया माँटेसरी. पूर्वप्राथमिक शाळानां माँटेसरी या नावाने ओळखले जाते यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १९५२)

१९०२: रिंगमास्टर, कसरतपटू व सर्कस मालक दामू धोत्रे यांचा जन्म.

१९०७: फिलिपाइन्सचे ७वे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १९५७)

१९१९: कागज ते कॅन्व्हास या कवितासंग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पंजाबी भाषेतील प्रथितयश लेखिका व कवयित्री अमृता प्रीतम यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर २००५)

१९३१: पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै २००५)

१९४०: मृत्युंजय कादंबरीचे लेखक साहित्यिक शिवाजी सावंत यांचा जन्म. (मृत्यू: १८ सप्टेंबर २००२)

१९४४: वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू क्लाइव्ह लॉइड यांचा जन्म.

१९६३: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक ऋतुपर्णा घोष यांचा जन्म.

१९६९: जलदगती गोलंदाज जवागल श्रीनाथ यांचा जन्म.

१९७९: भारतीय गायक-गीतकार आणि निर्माते युवन शंकर राजा यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.