३१ जानेवारी रोजी झालेले मृत्यू.

१९५४: एफ. एम. रेडिओचे संशोधक ई. एच. आर्मस्ट्राँग यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १८९०)

१९६९: आध्यात्मिक गुरू अवतार मेहेरबाबा यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १८९४ – पुणे, महाराष्ट्र)

१९७२: नेपाळचे राजे महेन्द्र यांचे निधन.

१९८६: संगीतकार विश्वनाथ मोरे यांचे निधन.

१९९४: मराठी व हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांचे निधन.

१९९५: बँकिंग तज्ञ, रोखे बाजार नियामक मंडळाचे (SEBI) चे अध्यक्ष सुरेश शंकर नाडकर्णी यांचे निधन.

२०००: नाटककार वसंत कानेटकर यांचे निधन. (जन्म: २० मार्च १९२०)

२०००: हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक कृष्ण नारायण तथा के. एन. सिंग यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९०८ – डेहराडून, उत्तराखंड)

२००४: व्हायोलिनवादक व्ही. जी. जोग यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १९२२)

२००४: गायिका व अभिनेत्री सुरैय्या जमाल शेख ऊर्फ सुरैय्या यांचे निधन. (जन्म: १५ जून १९२९)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.