३१ जुलै रोजी झालेल्या घटना.

१४९८: पश्चिम गोलार्धात तिसरा प्रवास करताना ख्रिस्तोफर कोलंबस हे त्रिनिदाद बेटांचा शोध लावणारे पहिले युपोपीय ठरले.

१६५७: मुघलांनी विजापूरचा कल्याणी किल्ला जिंकला.

१६५८: औरंगजेब मुघल सम्राट बनला.

१८५६: न्यूझीलंडची राजधानी ख्राइस्ट चर्चची स्थापना.

१९३७: के. नारायण काळे यांनी दिग्दर्शित केलेला वहाँ हा प्रभातचा चित्रपट मुंबईतील मिनर्व्हा टॉकीजमधे प्रदर्शित झाला.

१९५४: इटालियन गिर्यारोहकांनी के-२ (माउंट गॉडविन ऑस्टिन) हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर प्रथमच सर केले.

१९५६: कसोटी सामन्यातील एका डावात सर्व १० गडी बाद करण्याचा विक्रम करणारा जिम लेकर हा पहिला गोलंदाज बनला.

१९६४: रेंजर ७ अंतराळ यानाने चंद्राचे पहिले स्पष्ठ छायाचित्रे काढले.

१९९२: जॉर्जियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९९२: सतार वादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान.

२०००: वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि प्रगत तंत्रज्ञान केंद्राचे डॉ. डी. डी. भवाळकर यांना एच. के फिरोदिया पुरस्कार प्रदान.

२००१: दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू महाराज समता पुरस्कार प्रदान.

२००६: फिदेल कॅस्ट्रो यांनी आपल्या भावाला, राऊल यांच्याकडे सत्ता हस्तगत केली.

२०१२: मायकेल फेल्प्स यांनी ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सर्वाधिक पदक जीकाण्याचा विक्रम मोडला.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.