३१ मार्च रोजी झालेले जन्म.
१५०४: शिखांचे दुसरे गुरू गुरू अंगद देव यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १५५२)
१५१९: फ्रान्सचा राजा हेन्री (दुसरा) यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै १५५९)
१५९६: फ्रेन्च तत्त्वज्ञ, गणितज्ञ आणि लेखक रेनें देंकार्त यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १६५०)
१८४३: नाटककार बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: २ नोव्हेंबर १८८५)
१८६५: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८८७)
१८७१: स्वातंत्र्यसैनिक कर्नाटकसिंह गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९६०)
१९०२: भारतीय विद्वान ग्यानी चेत सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २०००)
१९३४: भारतीय कवी आणि लेखक कमला सुरय्या यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे २००९)
१९३८: दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांचा जन्म.
१९७२: ट्विटर चे सहसंस्थापक इव्हान विल्यम्स यांचा जन्म.
१९८७: भारतीय बुद्धिबळ खेळाडू हम्पी कोनेरू यांचा जन्म.