४ एप्रिल रोजी झालेले मृत्यू.

१६१७: स्कॉटिश गणितज्ञ आणि लॉगॅरिथम सारणीचे जनक जॉन नेपिअर यांचे निधन.

१९२३: ब्रिटिश गणितज्ञ जॉन वेन यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १८३४)

१९२९: मर्सिडीज-बेंझ कंपनीचे संस्थापक कार्ल बेन्झ यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १८४४)

१९३१: फ्रेन्च उद्योगपती आंद्रे मिचेलिन यांचे निधन. (जन्म: १६ जानेवारी १८५३)

१९६८: नोबेल पारितोषिक विजेते मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनियर) यांची हत्या झाली. (जन्म: १५ जानेवारी १९२९)

१९७९: पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान झुल्फिकार अली भत्तो यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १९२८)

१९८७: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते हिंदी लेखक आणि वृत्तपत्रकार सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन उर्फ अज्ञेय यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १९११- खुशीनगर, देवरिया, उत्तर प्रदेश)

१९९६: संस्कृत आणि मराठी साहित्यिक आनंद साधले यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १९२०)

२०००: कलादिग्दर्शक वसंतराव कृष्णाजी गोंधळेकर यांचे निधन.

२०१६: भारतीय वकील आणि राजकारणी पी. ए. संगमा यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९४७)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.