४ ऑगस्ट रोजी झालेले जन्म.

१७३०: पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी १७६१)

१८२१: लुई व्हिटोन कंपनीचे निर्माते लुई व्हिटोन यांचा जन्म. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १८९२)

१८३४: ब्रिटिश गणितज्ञ जॉन वेन यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९२३)

१८४५: कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक सर फिरोजशहा मेहता यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर १९१५)

१८६३: पातंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांचा जन्म.

१८८८: भारतीय धर्मगुरू ताहेर सैफुद्दीन यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९६५)

१८९४: साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम तथा ना. सी. फडके यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑक्टोबर १९७८)

१९२९: पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९८७)

१९३१: यष्टीरक्षक आणि फलंदाज नरेन ताम्हाणे यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च २००२)

१९३१: महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा जन्म.(मृत्यू: ४ ऑगस्ट २०२०)

१९५०: भारतीय वकील आणि राजकारणी एन. रंगास्वामी यांचा जन्म.

१९६१: अमेरिकेचे ४४ वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते बराक ओबामा यांचा जन्म.

१९७८: भारतीय राजकारणी संदीप नाईक यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.