४ डिसेंबर रोजी झालेल्या घटना.

१७९१: द ऑब्जर्व्हर हे जगातील पहिले रविवार वृत्तपत्र प्रकाशित झाले.

१८२९: भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंगने जाहीरनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणाऱ्यांना खुनी ठरवले जाईल असा कायदा केला. तसेच सतीप्रथा बंद केली.

१८८१: लॉस ऍन्जेलिस टाइम्स वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला.

१९२४:  गेट वे ऑफ इंडिया या वास्तूचे व्हाईसराय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्घाटन.

१९६७: थुंबा येथील तळावरुन रोहिणी या पहिल्या भारतीय अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण.

१९४८: भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक झाली.

१९७१: भारत पाकिस्तान तिसरे युद्ध-ऑपरेशन ट्रायडेंट भारतीय आरमाराने कराची वर हल्ला केला.

१९७५: सुरीनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९९१: पॅन अ‍ॅम या अमेरिकन विमानकंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.

१९९३: उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर आणि पंडित एस. सी. आर. भट यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर.

१९९७: संगीत दिग्दर्शक कल्याणजी-आनंदजी यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.