४ डिसेंबर रोजी झालेले जन्म.

१८३५: इंग्लिश लेखक सॅम्युअल बटलर यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १९०२)

१८५२: रशियन भौतिकशास्त्रज्ञ ओरेस्ट ख्वोल्सन यांचा जन्म.

१८६१: आइसलँड देशाचे पहिले पंतप्रधान हंगेस हफस्टाइन यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १९२२)

१८९२: स्पेनचा हुकुमशहा फ्रान्सिस्को फ्रँको यांचा जन्म.

१९१०: भारताचे माजी राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी २००९)

१९१०: आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते मोतीलाल राजवंश ऊर्फ मोतीलाल यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १९६५)

१९१६: पंजाबी नाटककार, दिग्दर्शक, कादंबरीकार व लघुकथाकार, पंजाब विद्यापीठातील भारतीय रंगभूमी विभागाचे प्रमुख बळवंत गार्गी यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल २००३ – मुंबई)

१९१९: भारताचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचा जन्म.

१९३२: दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष रोह तै-वू यांचा जन्म.

१९३५: पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक शंकर काशिनाथ बोडस यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९९५)

१९४३: मराठी लेखक कॅथोलिक ख्रिस्ती फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जन्म.

१९७७: भारतीय क्रिकेटर अजित आगरकर यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.