४ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म.

१८९३: मराठी कोशकार आणि लेखक चिंतामण गणेश कर्वे यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९६०)

१९०२: धाडसी अमेरिकन वैमानिक चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट १९७४)

१९१७: पाकिस्तानचे ३ रे राष्ट्राध्यक्ष जनरल ह्याह्याखान यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट १९८०)

१९२२: शास्त्रीय गायक स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी २०११)

१९३८: लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक व गुरू पं. बिरजू महाराज यांचा जन्म.

१९७४: चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.