४ जानेवारी रोजी झालेले मृत्यू.

१७५२: स्विस गणिती गॅब्रिअल क्रॅमर यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १७०४)

१८५१: दुसरे बाजीराव पेशवे यांचे निधन.

१९०७: गुजराथी लेखक गोवर्धनराम त्रिपाठी यांचे निधन, सरस्वतीचंद्र हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे. (जन्म: २० ऑक्टोबर १८५५)

१९०८: विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत राजारामशास्त्री भागवत यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८५१)

१९६१: नोबेल पारितोषिक विजेते ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ आयर्विन श्रॉडिंगर यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८८७)

१९६५: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन साहित्यिक टी. एस. इलियट यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १८८८)

१९९४: सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट संगीतकार आर. डी. बर्मन तथा राहुल देव बर्मन तथा पंचमदा यांचे निधन. (जन्म: २७ जून १९३९)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.