४ जुलै रोजी झालेले मृत्यू.

१७२९: मराठा आरमारप्रमुख (सेना सरखेल) कान्होजी आंग्रे यांचे निधन.

१८२६: अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडॅम्स यांचे निधन. (जन्म: ३० ऑक्टोबर १७३५)

१८३१: अमेरिकेचे पाचवे राष्ट्राध्यक्ष जेम्स मोन्रो यांचे निधन. (जन्म: २८ एप्रिल १७५८)

१९०२: भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८६३)

१९३४: नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ मेरी क्युरी यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १८६७)

१९६३: भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली वेंकय्या यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८७६)

१९८०: रसाळ लेखन करणारे कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १८९६)

१९८२: भक्तिप्रधान, पौराणिक चित्रपटांचे गीतकार भरत व्यास यांचे निधन.

१९९९: विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित वसंत शिंदे यांचे निधन. (जन्म: १४ मे १९०९)

२०२०: कृष्णा चेतना आंतरराष्ट्रीय संस्था (इस्कॉन) चे आध्यात्मिक नेते भक्ती चारू स्वामी यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९४५)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.