४ जून रोजी झालेले जन्म.

१७३८: इंग्लंडचा राजा जॉर्ज (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: २९ जानेवारी १८२०)

१९०४: भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी भगत पुराण सिंह यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९९२)

१९१०: होव्हर्क्राफ्ट चे शोधक ख्रिस्तोफर कॉकेरेल्म यांचा जन्म. (मृत्यू: १ जुन १९९९)

१९१५: माली देशाचे पहिले अध्यक्ष मालिबो केएटा यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे १९७७)

१९३६: चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९९१)

१९४६: दाक्षिणात्य चित्रपटातील पार्श्वगायक पद्मश्री व पद्मभूषण एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांचा जन्म. (निधन: २५ सप्टेंबर २०२०)

१९४७: विनोदी अभिनेता अशोक सराफ यांचा जन्म.

१९७४: भारतीय शेफ जॅकब सहाय्या कुमार अरुनी यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर २०१२)

१९७५: अमेरिकन अभिनेत्री अँजेलिना जोली यांचा जन्म.

१९९०: भूतानची राणी जेत्सुनपेमा वांग्चुक यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.