४ मे रोजी झालेले जन्म.

१००८: पर्शियन सूफी संत ख्वाजा अब्दूल्ला अन्सारी यांचा जन्म.

१००८: फ्रान्सचा राजा हेन्‍री (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑगस्ट १०६०)

१६४९: बुंदेलखंड चे महाराजा छत्रसाल बुंदेला यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १७३१)

१६५५: पियानोचे निर्मिते बार्टोलोमीओ क्रिस्टोफोरी यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी  १७३१)

१७६७: दाक्षिणात्य संगीतकार त्यागराज यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १८४७)

१८२५: ब्रिटीश जीवशास्रज्ञ आणि विज्ञानकथा लेखक थॉमास हक्सले यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून १८९५ – इस्ट्बोर्न, इंग्लंड)

१८४७: धार्मिक आणि राष्ट्रीय मनोवृत्तीचे पुण्यातील एक नामांकित धन्वंतरी व लोकमान्य टिळकांचे स्‍नेही महर्षी विनायक रामचंद्र उर्फ अण्णासाहेब पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९१७)

१९२८: इजिप्तचे ४थे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांचा जन्म.

१९२९: ब्रिटिश अभिनेत्री, संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या (UNICEF) सदिच्छा प्रतिनिधी ऑड्रे हेपबर्न यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी १९९३)

१९३३: प्रख्यात मराठी कादंबरीकार बाबा कदम यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर २००९)

१९३४: भावगीत गायक अरुण दाते यांचा जन्म.

१९४०: इंग्लिश कादंबरीकार रॉबिन कुक यांचा जन्म.

१९४२: विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लगार सॅम पित्रोदा यांचा जन्म.

१९४३: भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रसांत पटनाईक याचा जन्म.

१९४५: ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांचा जन्म.

१९८४: बांगला देशचा क्रिकेटपटू मंजुरूल इस्लाम यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च २००७)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.