४ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म.

१६१८: मुघल सम्राट औरंगजेब याचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १७०७)

१८४५: भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे एक आद्य प्रवर्तक वासुदेव बळवंत फडके यांचा शिरढोण जि. कुलाबा, रायगड येथे जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी १८८३)

१८७१: मानववंशशास्त्रज्ञ शरदचंद्र रॉय यांचा जन्म.

१८८४: प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९४२)

१८८४: ट्रॅक्टरचे निर्माते हॅरी फर्ग्युसन यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर १९६०)

१८९४: कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च १९७१)

१८९७: भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ जानकी अम्माल यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी १९८४)

१९१६: बार्बी बाहुलीच्या निर्मात्या रुथ हँडलर यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल २००२)

१९२५: चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक ऋत्विक घटक यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९७६)

१९२९: शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील संगीतकार जयकिशन डाह्याभाई पांचाळ यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९७१)

१९२९: गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला शकुंतलादेवी यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल २०१३)

१९३०: भारतीय औषधीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक रंजीत रॉय चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर २०१५)

१९३४: दिग्दर्शिका विजया मेहता यांचा जन्म.

१९५०: व्हर्जिन ग्रुपचे सहसंस्थापक निग पॉवेल यांचा जन्म.

१९५५: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अल्हाज मौलाना घोसी शाह यांचा जन्म.

१९७१: अभिनेत्री तब्बू यांचा जन्म.

१९८६: भारतीय उद्योजक सुहास गोपीनाथ यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.