४ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म.

१८२२: अमेरिकेचे १९ वे राष्ट्राध्यक्ष रुदरफोर्ड हेस यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १८९३)

१८८४: भारतीय इतिहासकार आणि लेखक रामचंद्र शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९४१)

१९१३: शास्त्रीय गायिका सरस्वतीबाई राणे यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २००६)

१९१३: हैती देशाचे पहिले पंतप्रधान मार्टिअल सेलेस्टीन यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी २०११)

१९१६: अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला यांचा जन्म.

१९२८: अमेरिकन पत्रकार व लेखक ऑल्विन टॉफलर यांचा जन्म.

१९३५: मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादक अरुण सरनाईक यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून १९८४)

१९३७: इंग्लिश लेखिका व अभिनेत्री जॅकी कॉलिन्स यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.