४ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू.

१६६९: डच चित्रकार रेंब्राँ यांचे निधन. (जन्म: (जन्म: १५ जुलै १६०६)

१८४७: महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १७९३)

१९०४: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकर फ्रेडेरीक ऑगस्टे बर्थॉल्ड यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८३४)

१९२१: गायक, नट केशवराव भोसले यांचे निधन. (जन्म: ९ ऑगस्ट १८९०)

१९४७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ मॅक्स प्लँक यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १८५८)

१९६६: सत्यकथा चे संपादक अनंत अंतरकर यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १९११)

१९८२: मराठी कवी सोपानदेव चौधरी यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १९०७)

१९८९: संगीतकार, गायक व नट संगीतभूषण पं. राम मराठे यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १९२४)

१९९३: अभिनेते जॉन कावस यांचे निधन.

२००२: वृत्तपट निवेदक भाई भगत यांचे निधन.

२०१५: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता एडिडा नागेश्वर राव यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १९३४)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.