४ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.

१२२१: महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म. (मृत्यू: ७ फेब्रुवारी १२७४)

१८२५: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म. (मृत्यू: ३० जून १९१७)

१९०१: जॅग्वोर कार चे सहसंस्थापक विल्यम लियन्स जॅग्वोर यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९८५)

१९०५: मिनॉक्स चे शोधक वॉल्टर झाप यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै २००३)

१९१३: प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी. एन. हक्सर यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९९८)

१९२३: भारतीय वकील आणि राजकारणी राम किशोर शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००३)

१९३७: साहित्यिक व समीक्षक शंकर सारडा यांचा जन्म.

१९४१: केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा जन्म.

१९५२: अभिनेता ऋषी कपूर यांचा जन्म.

१९६२: यष्टीरक्षक किरण मोरे यांचा जन्म.

१९६४: भारतीय गायक-गीतकार आदेश श्रीवास्तव यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर २०१५)

१९७१: दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू लान्स क्लूसनर यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.