५ एप्रिल रोजी झालेले जन्म.

१८२७: निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद सर जोसेफ लिस्टर यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी १९१२)

१८५६: अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ बुकर टी. वॉशिंग्टन यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९१५)

१९०८: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै १९८६)

१९०९: जेम्स बाँड चित्रपटांचे निर्माते अल्बर्ट आर. ब्रोकोली यांचा जन्म. (मृत्यू: २७ जून १९९६)

१९१६: हॉलीवूड अभिनेता ग्रेगरी पेक यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून २००३)

१९२०: महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य डॉ. रफिक झकारिया यांचा जन्म. (मृत्यू: ९ जुलै २००५)

१९२०: इंग्लिश कादंबरीकार आर्थर हॅले यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर २००४)

१९६६: भारतीय-अमेरिकन अभिनेते आणि निर्माते आसिफ मांडवी यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.