५ एप्रिल रोजी झालेले मृत्यू.

१९१७: स्वातंत्र्यशाहीर शंकरराव निकम यांचे निधन.

१९२२: आर्य महिला समाजच्या संस्थापिका पंडिता रमाबाई यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १८५८)

१९४०: इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८७१)

१९६४: नकलाकार गोपाळ विनायक भोंडे यांचे निधन.

१९९३: हिंदी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री दिव्या भारती यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १९७४)

१९९६: बालगंधर्वांना पंधरा वर्षे साथ करणारे ऑर्गनवादक भालचंद्र नीळकंठ तथा बाबा पटवर्धन यांचे निधन.

१९९८: चित्रपट व नाट्य अभिनेत्री रुही बेर्डे यांचे निधन.

२००२: दुबईस्थित वादग्रस्त भारतीय उद्योगपती, जम्बो ग्रुपचे संचालक मनोहर राजाराम तथा मनू छाबरिया यांचे निधन.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.