५ ऑगस्ट रोजी झालेले जन्म.

१९४७: श्रीलंकेचे क्रिकेटर टोनी ओपाथा यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर २०२०)

१८५८: इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी वासुदेव वामन तथा वासुदेवशास्त्री खरे यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १९२४)

१८९०: इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, पद्मविभूषण महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९७९)

१९३०: चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट २०१२)

१९३३: लेखिका व समीक्षिका विजया राजाध्यक्ष यांचा जन्म.

१९५०: भारतीय वकील आणि राजकारणी महेंद्र कर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे २०१३)

१९६९: जलदगती गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांचा जन्म.

१९७२: पाकिस्तानी जलदगती गोलंदाज अकिब जावेद यांचा जन्म.

१९७४: भारतीय अभिनेत्री काजोल यांचा जन्म.

१९८७: भारतीय अभिनेत्री जेनेलिया डिसोझा यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.