५ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू.

८८२: फ्रान्सचा राजा लुई (तिसरा) यांचे निधन.

१९६२: अमेरिकन अभिनेत्री मेरिलीन मन्‍रो यांनी गोळी मारून आत्महत्या केली. (जन्म: १ जून १९२६)

१९८४: अभिनेता रिचर्ड बर्टन यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १९२५)

१९९१: होंडा कंपनी चे स्थापक सुइचिरो होंडा यांचे निधन. (जन्म: १७ नोव्हेंबर १९०६)

१९९२: स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते अच्युतराव पटवर्धन यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९०५)

१९९७: स्वातंत्र्यसैनिक, कम्युनिस्ट व नक्षलवादी नेते के. पी. आर. गोपालन यांचे निधन.

२०००: भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, स्वतंत्र भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व स्वतंत्र भारताचे पहिले शतकवीर लाला अमरनाथ भारद्वाज यांचे निधन.

२००१: गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्‍ना भोळे यांचे निधन. (जन्म: ११ मे १९१४)

२०१४: भारतीय-इंग्रजी इतिहासकार चापमॅन पिंचर यांचे निधन. (जन्म: २९ मार्च १९१४)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.