५ डिसेंबर रोजी झालेले जन्म.

१८६३: फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ पॉल पेनलीव्ह यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९३३)

१८९४: ऊर्दू कवी जोश मलिहाबादी यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९८२)

१८९६: नोबेल पारितोषिक विजेते शास्रज्ञ कार्ल कोरी यांचा जन्म.

१८९७: सेसेना एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक क्लाईड व्हर्नन सेसेना यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९५४)

१८९८: भारतीय-पाकिस्तानी कवी आणि अनुवादक जोश मलिहाबादी यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९८२)

१९०१: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वेर्नर हायसेनबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: १ फेब्रुवारी १९७६)

१९०१: अ‍ॅनिमेशनपटांचे प्रणेते, मिकी माऊस चे जनक वॉल्ट इलायन डिस्‍ने यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९६६)

१९०५: शेर-ए-कश्मीर शेख अब्दुल्ला यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर १९८२)

१९२७: थायलँडचा राजा भुमिबोल अदुल्यतेज ऊर्फ राम (नववा) यांचा जन्म.

१९३१: १४ वे नौसेनाप्रमुख अ‍ॅडमिरल जयंत नाडकर्णी यांचा जन्म.

१९४३: वर्‍हाड निघालंय लंडनला साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी २००९)

१९६५: भारतीय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांचा जन्म.

१९७४: भारतीय पत्रकार आणि लेखक रविश कुमार यांचा जन्म.

१९८५: भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.