५ मार्च रोजी झालेल्या घटना.

१५५८: फ्रान्सिस्को फर्नांडिस यांनी धुम्रपान बनवण्यात पहिल्यांदा तंबाखूचा वापर केला.

१६६६: छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावरून आग्र्याला प्रयाण केले.

१८५१: जिओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया ची स्थापना झाली.

१९३१: दुसर्‍या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला.

१९३३: भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली.

१९६६: म्हैसूरचे राजे वाडियार यांचा बंगळुरूमध्ये असेलेला राजवाडा सरकारच्या ताब्यात घेण्याचा विधेयक मंजूर झाला.

१९९७: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट प्रकाशीत झाले.

१९९७: धार्मिक जनजागृतीबद्दल दिला जाणारा जॉन एम. टेम्पलटन पुरस्कार पांडुरंगशास्त्री आठवले यांना जाहीर करण्यार आला.

१९९८: रशियाकडून घेतलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीचे मुंबईत आगमन झाले.

२०००: कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित केला.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.