५ मार्च रोजी झालेले मृत्यू.
१८२७: इटालीय भौतिकशास्त्रज्ञ अलासांड्रो व्होल्टा यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १७४५)
१९१४: नाटककार, समीक्षक आणि प्राध्यापक शांताराम अनंत देसाई यांचे निधन.
१९५३: सोव्हियत रशियाचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ स्टॅलिन यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १८७८)
१९६६: साम्यवादी विह्चारांचे व्यासंगी नेते शंकरराव मोरे यांचे निधन.
१९६८: समाजशास्त्रज्ञ व ग्रंथकार नारायण गोविंद चाफेकर यांचे निधन.
१९८५: महाराष्ट्र संस्कृतीकार पु. ग. सहस्रबुद्धे यांचे निधन.
१९८५: कोशागार, तत्वज्ञ तत्त्वज्ञान महाकोशाचे संपादक देविदास दत्तात्रय वाडेकर यांचे निधन.
१९८९: गदार पार्टीचे एक संस्थापक बाबा पृथ्वीसिंग आझाद यांचे निधन.
१९९५: हिंदी चित्रपट अभिनेते जलाल आगा यांचे निधन.
२०१३: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ यांचे निधन. (जन्म: २८ जुलै १९५४)