५ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू.

१८७९: प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनलेला असतो असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक व गणितज्ञ जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांचे निधन. (जन्म: १३ जून १८३१ – एडिंबर्ग, यु. के.)

१९१५: राष्ट्रीय सभेचे संस्थापक व मुंबईचा सिंह उर्फ फिरोजशहा मेरवानजी मेहता यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १८४५)

१९५०: चतुरंग गवई फय्याझ खाँसाहेब यांचे निधन.

१९९१: कथालेखिका व कादंबरीकार शकुंतला विष्णू गोगटे यांचे निधन.

२०११: संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर १९२६)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.