५ ऑक्टोबर रोजी झालेल्या घटना.

१८६४: भीषण चक्री वादळामुळे कोलकाता शहर उद्धवस्त होऊन सुमारे ६०,००० लोक ठार झाले.

१९१०: पोर्तुगालमधील राजसत्ता संपुष्टात येऊन ते प्रजासत्ताक बनले.

१९४८: अश्गाबात येथील भूकपात सुमारे १,१०,००० लोक ठार झाले.

१९५५: पंडित नेहरुंच्या हस्ते हिंदुस्तान मशिन टूल्स या कारखान्याचे उद्‍घाटन झाले. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.

१९६२: डॉ. नो हा पहिला जेम्सबाँड चित्रपट प्रदर्शित झाला.

१९८९: मीरासाहेब फातिमा बिबी या सर्वोच्‍च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.

१९९५: कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर.

१९९८: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.