६ एप्रिल रोजी झालेले जन्म.

१७७३: स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ जेम्स मिल यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १८३६)

१८६४: ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ सर विल्यम हार्डी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी १९३४)

१८९०: फोक्कर एअरक्राफ्ट मॅनुफॅक्चर चे निर्माते अँटनी फोक्कर यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १९३९)

१८९०: उर्दू कवी व शायर अली सिकंदर ऊर्फ जिगर मोरादाबादी यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर १९६०)

१८९२: डग्लस एअरक्राफ्ट कंपनी चे निर्माते डोनाल्ड विल्स डग्लस यांकॅह जन्म. (मृत्यू:  १ फेब्रुवारी १९८१)

१९०९: भावगीतगायक व संगीतकार जी. एन. जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९९४)

१९१७: मराठी कथाकार व कवी काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांचा जन्म. (मृत्यू: १८ नोव्हेंबर २००६)

१९१९: कोंकणी कवी रघुनाथ विष्णू पंडित यांचा जन्म.

१९२७: उद्योजक विष्णू महेश्वर ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग यांचा जन्म. (मृत्यू: २८ जून २०००)

१९२८: फ्रान्सिस क्रीक व मॉरिस विल्कीन्स या जोडीदारांसह डीएनएची संरचना स्पष्ट करणारे नोबेल पारितोषिक विजेते जैवरसायनशास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचा जन्म.

१९३१: बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेत्री रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१४ – कोलकता, पश्चिम बंगाल)

१९५६: क्रिकेटपटू व प्रबंधक दिलीप वेंगसरकर यांचा जन्म

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.