६ एप्रिल रोजी झालेले मृत्यू.

११९९: इंग्लंडचा राजा रिचर्ड (पहिला) यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर ११५७)

१९५५: धर्मभास्कर विनायक महाराजा मसूरकर यांचे निधन.

१९८१: मानवधर्माचे उपासक शंकर धोंडो तथा मामा क्षीरसागर यांचे निधन.

१९८३: भारताचे लष्करप्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्‌मविभूषण जनरल जयंतोनाथ चौधरी यांचे निधन. (जन्म: १० जून १९०८)

१९८९: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार पन्नालाल पटेल यांचे निधन. (जन्म: ७ मे १९१२ – मांडली, डुंगरपूर, राजस्थान)

१९९२: अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक आयझॅक असिमॉव्ह यांचे निधन. (जन्म: २ जानेवारी १९२०)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.