६ ऑगस्ट – मृत्यू

१९२५: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक , राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १८४८)

१९६५: संगीतकार वसंत पवार यांचे निधन.

१९९१: ईराणचे ७४ वे पंतप्रधान शापूर बख्तियार यांचे निधन. (जन्म: २६ जून १९१४)

१९९७: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर १९२४)

१९९९: केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार (३ वेळा), लोकसभा खासदार (४ वेळा), काँग्रेसचे नेते कल्पनाथ राय यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९४१ – सेमरी जमालपूर, माऊ, उत्तर प्रदेश)

२००१: भारतीय नौदल प्रमुख आधार कुमार चॅटर्जी  यांचे निधन.

२०१९: २५ व्या वर्षीच हरयाणाच्या कॅबिनेट मंत्री, १९९८ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री,  २०००-२००३ माहिती आणि प्रसारण मंत्री, २००३-२००४ आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री, २०१४ मध्ये भाजप सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिलं अश्या भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांचे निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १९५२)