६ जानेवारी रोजी झालेले मृत्यू.

१७९६: महादजी शिंदे यांचे सेनापती जिवबा दादा बक्षी यांचे निधन.

१८४७: दाक्षिणात्य संगीतकार त्यागराज यांचे निधन. (जन्म: ४ मे १७६७)

१८५२: अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक लुई ब्रेल यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १८०९)

१८८४: जनुकांची (genes) संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ ग्रेगोर मेंडेल यांचे निधन. (जन्म: २० जुलै १८२२)

१८८५: आधुनिक हिंदी साहित्याचे जनक भारतेंदू हरीश्चंद यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १८५०)

१९१८: जर्मन गणितज्ञ जी. कँटर यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १८४५)

१९१९: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे २६वे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १८५८)

१९७१: जादूगार प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार यांचे निधन. (जन्म: २३ फेब्रुवारी १९१३)

१९८१: स्कॉटिश लेखक ए. जे. क्रोनिन यांचे निधन. (जन्म: १९ जुलै १८९६)

१९८४: महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार विद्यानिधी सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १८८४)

२०१०: लेखक आणि इंग्रजीचे प्राध्यापक प्रल्हाद इरबाजी सोनकांबळे यांचे निधन. (जन्म: १६ जुलै १९४३)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.