६ मार्च रोजी झालेले मृत्यू.

१९४७: ब्रिटीश भूराजनीतिज्ञ आणि राजकारणी मकिंडर हॉलफोर्ड जॉन यांचे निधन.

१९६७: कर्तबगार प्रशासक स. गो. बर्वे  यांचे निधन.

१९६८: साहित्यिक नारायण गोविंद चापेकर उर्फ ना. गो. चापेकर यांचे निधन.

१९७३: नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन लेखिका पर्ल एस. बक यांचे निधन. (जन्म: २६ जून १८९२)

१९८१: रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे पहिले भारतीय प्राचार्य गो. रा. परांजपे  यांचे निधन.

१९८२: आदर्श लोकप्रतिनिधी खासदार रामभाऊ म्हाळगी यांचे निधन.

१९८२: जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या अ‍ॅन रँड यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९०५)

१९९२: सुप्रसिद्ध मराठी लेखक रणजीत देसाई यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल १९२८)

१९९९: हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते सतीश वागळे यांचे निधन.

२०००: कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती नारायण काशिनाथ लेले यांचे निधन.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.