६ मे रोजी झालेले मृत्यू.

१५८९: अकबराच्या दरबारातील एक नवरत्‍न रामतनू पांडे ऊर्फ मोहमाद आट्टा खान तथा संगीतसम्राट तानसेन येथे निधन.

१८६२: अमेरिकन लेखक व विचारवंत हेन्‍री थोरो येथे निधन. (जन्म: १२ जुलै १८१७)

१९२२: सामाजिक सुधारणांचे कृतिशील पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज यांचे निधन. (जन्म: २८ जून १८७४)

१९४६: भुलाभाई देसाई राजनीतीज्ञ यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १८७७)

१९५२: इटालियन डॉक्टर शिक्षणतज्ञ मारिया माँटेसरी यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १८७०)

१९६६: उदारमतवादी समाजसुधारक, नेमस्त पुढारी आणि शिक्षणज्ज्ञ रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १८७६)

१९९५: प्रवचनकार, संत वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आचार्य गोविंदराव गोसावी येथे निधन.

१९९९: पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य कृष्णाजी शंकर हिंगवे येथे निधन.

२००१: विख्यात मराठी कादंबरीकार, लेखिका मालतीबाई बेडेकर यांचे पुणे येथे निधन.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.