७ एप्रिल रोजी झालेले जन्म.

१५०६: ख्रिस्ती धर्मप्रसारक सेंट फ्रान्सिस झेविअर यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १५५२ – साओ जोआओ, चीन)

१७७०: स्वच्छंदतावादाचे प्रणेते आणि इंग्लिश कवी विल्यम वर्डस्वर्थ यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १८५०)

१८६०: केलॉग्ज चे मालक विल केलॉग यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९५१)

१८९१: जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेविड लो यांचा जन्म. (मृत्यू: १९ सप्टेंबर १९६३ – लंडन, इंग्लंड)

१९२०: भारतरत्‍न सतार वादक पंडित रविशंकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर २०१२)

१९२५: केंद्रीय कृषिमंत्री व कामगार नेते चतुरानन मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै २०११)

१९३८: भाजपाचे लोकसभा सदस्य काशीराम राणा यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट २०१२)

१९४२: हिंदी चित्रपट अभिनेते जितेंद्र यांचा जन्म.

१९५४: हाँग काँगचे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते जॅकी चेन यांचा जन्म.

१९८२: भारतीय वंशाचा अमेरिकन व्यावसायिक कुस्तीगीर सोंजय दत्त यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.