७ जून रोजी झालेले मृत्यू.

१८२१: रोमेनियाचे क्रांतिकारी ट्युडोर व्ह्लादिमिरेस्कु यांचे निधन.

१९५४: ब्रिटीश गणितज्ञ आणि संगणकशास्त्रज्ञ ऍलन ट्युरिंग यांचे निधन. (जन्म: २३ जुन १९१२)

१९७०: ब्रिटिश साहित्यिक इ. एम. फोर्स्टर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८७९)

१९७८: नोबेल पारितोषिक विजेते नॉरिश रसायनशास्त्रज्ञ रोनाल्ड जॉर्ज व्रेफोर्ड यांचे निधन.

१९९२: मराठी वाङ‌्मयाचे अभ्यासक आणि संशोधक डॉ. स. ग. मालशे यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९२१)

१९९२: नासकार चे सहसंस्थापक बिल फ्रान्स सीनियर यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १९०९)

२०००: बालसाहित्यिक गोपीनाथ तळवलकर यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १९०७)

२००२: भारताचे उपराष्ट्रपती बसप्पा दानप्पा तथा बी. डी. जत्ती यांचे निधन. (जन्म: १० सप्टेंबर १९१२)

२०२०: भारतीय कन्नड चित्रपट अभिनेते चिरंजीवी सर्जा यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९८४)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.