७ मे रोजी झालेले मृत्यू.

१९२४: भारतीय कार्यकर्ते अलायरी सीताराम राजू यांचे निधन.

१९९१: लोककवी मनमोहन उर्फ गोपाल नरहर नातू यांचे पुणे येथे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १९११)

१९९४: ध्रुपद गायक उस्ताद नसीर झहिरुद्दिन डागर यांचे निधन.

२००१: लेखिका मालती बेडेकर ऊर्फ विभावरी शिरुरकर यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १९०५)

२००१: गीतकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रेम धवन यांचे निधन. (जन्म: १३ जून १९२३ – अंबाला, पंजाब)

२००२: मराठी अस्मितेच्या व विचार स्वातंत्र्याच्या बुलंद पुरस्कर्त्या, जेष्ठ लेखिका, तत्त्ववेत्या आणि निसर्गाच्या अभ्यासक दुर्गाबाई भागवत यांचे मुंबई येथे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १९१०)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.