७ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म.

१८५८: लाल-बाल-पाल या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल यांचा जन्म. (मृत्यू: २० मे १९३२)

१८६७: नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ मेरी क्यूरी यांचा वाॅर्सा पोलंड येथे जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९३४)

१८६८: व्याकरणकार व निबंधकार मोरो केशव दामले यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल १९१३)

१८७९: रशियन क्रांतिकारक लिऑन ट्रॉट्स्की यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९४०)

१८८४: क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टी चे शिल्पकार डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९६७)

१८८८: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण यांचा जन्म. (मृत्यू: २१ नोव्हेंबर १९७०)

१९००: स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते आणि काँग्रेसचे पुढारी प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू ऊर्फ एन. जी. रंगा यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९९५)

१९०३: शिक्षणशास्त्र, मानस व बालमानस या विषयांचे लेखक भास्कर धोंडो कर्वे यांचा जन्म.

१९१५: महाराष्ट्रातील विचारवंत व शिक्षणतज्ञ गोवर्धन धनराज पारिख यांचा जन्म.

१९२२: भारतीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्याबेन शाह यांचा जन्म. (मृत्यू: १९ जून २०२०)

१९५४: अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक कमल हासन यांचा जन्म.

१९६०: भारतीय चित्रपट निर्माते श्यामप्रसाद यांचा जन्म.

१९७१: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक त्रिविक्रम श्रीनिवास यांचा जन्म.

१९७५: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक वेंकट प्रभू यांचा जन्म.

१९८०: भारतीय गायक-गीतकार कार्तिक यांचा जन्म.

१९८१: भारतीय अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.