७ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू.

१५६२: मारवाडचे राव मालदेव राठोड यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १५११)

१८६२: दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जफर यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १७७५)

१९०५: आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत यांचे हुबळी येथे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १८६६)

१९२३: भारतीय शिक्षक अश्विनीकुमार दत्ता यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १८५६)

१९४७: भारतीय-श्रीलंकेचे पत्रकार आणि राजकारणी के. नतेसा अय्यर यांचे निधन.

१९६३: मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९०१)

१९८०: हॉलिवूड अभिनेता स्टीव्ह मॅकक्‍वीन यांचे निधन. (जन्म: २४ मार्च १९३०)

१९८१: अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ विल डुरांट यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १८८५)

१९९८: शास्त्रीय गायक, संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक पं. जितेंद्र अभिषेकी यांचे निधन. (जन्म: २१ सप्टेंबर १९२९)

२०००: ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीयमंत्री, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि हरितक्रांतीचे अध्वर्यू सी.सुब्रह्मण्यम यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९१०)

२००६: भारतीय क्रिकेटर आणि मॅनेजर पॉली उम्रीगर यांचे निधन. (जन्म: २८ मार्च १९२६)

२००९: लेखिका व स्वातंत्र्यसैनिक सुनीता देशपांडे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १९२६)

२०१५: भारतीय दिग्दर्शक आणि कवी बाप्पादित्य बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९७०)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.